Welcome to the Manthan Publication.

📞  09922950627          📩  [email protected]   

Terms of Examination

* मंथन सामान्य ज्ञान परीक्षा – नियम व अटी*

1. परीक्षा संदर्भात आपल्या पाल्याची सर्व जबाबदारी संबंधित पालकांची असेल.

2. परीक्षा केंद्र तालुक्याच्या ठिकाणी अथवा तालुक्यातील सोयीच्या ठिकाणी असेल.

3. आपल्या पाल्याला परीक्षा केंद्रावर ने- आण करण्याची जबाबदारी पालकाची असेल.

4. परीक्षेच्या दिवशी परीक्षा केंद्रावर अचानक काही अन्य कार्यक्रम आयोजित केला गेल्यास पर्यायी  केंद्राची व्यवस्था केली जाईल त्यामुळे परीक्षा अर्धा किंवा एक तास उशिरा सुरू होण्याची शक्यता असते, अशावेळी आमच्या समन्वयकांना सहकार्य करणे आवश्यक आहे.

5. काही अपरिहार्य कारणास्तव परीक्षा केंद्र उपलब्ध न झाल्यास संबंधित परीक्षा केंद्रावरील विद्यार्थ्यांच्या परीक्षा तारखेत बदल करण्याचा अधिकार परीक्षा आयोजकांना राहील.

6. परीक्षेचा निकाल मंथन वेल्फेअर फाउंडेशनच्या www.manthanwelfarefoundation.org या संकेत स्थळावर पहावयास मिळेल त्याचबरोबर सर्व वर्गांची उत्तर सूची व विद्यार्थ्यांनी सोडवलेली उत्तर पत्रिका ही पहावयास मिळेल. प्रिंट काढता येईल.

7. परीक्षा केंद्रावर जागेअभावी बेंचेस उपलब्ध न झाल्यास परीक्षार्थीला जमिनीवर बसावे लागेल यासाठी विद्यार्थ्याने पॅड व इतर परीक्षा विषयक साहित्य बरोबर आणणे आवश्यक आहे. 

8. काही अपरिहार्य कारणास्तव परीक्षार्थींना बैठक व्यवस्थेसाठी शाळा उपलब्ध न झाल्यास परीक्षार्थींची परीक्षा ही भारतीय बैठक पद्धतीने एखाद्या सांस्कृतिक /खाजगी सभागृहात अथवा खुल्या मैदानात आयोजित केली जाईल.

9. परीक्षेच्या दिवशी इतर कोणत्याही संस्थेमार्फत अन्य परीक्षा आयोजित केल्या गेल्या असतील तर अशा विद्यार्थ्यांसाठी पर्यायी व्यवस्था केली जाणार नाही.

10. पारितोषिकांच्या संदर्भातील सर्व हक्क परीक्षा आयोजकांकडे राखून ठेवले आहेत. पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांची संख्या सहभागी विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार कमी-जास्त करण्याचा अधिकार आयोजकांना राहील.

11. एका परीक्षार्थी विद्यार्थ्याला राज्यस्तरीय किंवा केंद्रस्तरीय यांपैकी फक्त एकच बक्षीस दिले जाईल.

12. मंथन वेलफेअर फाऊंडेशन ही नोंदणीकृत सामाजिक उत्तरदायित्व असलेली संस्था असल्यामुळे संस्थेच्या स्पर्धा परीक्षा विभागाने आयोजित केलेल्या खाजगी परीक्षांच्या नियोजनात बदल करण्याचा अधिकार परीक्षा आयोजकांना राहील. शासनाची मंथन वेल्फेअर फाउंडेशन ला परीक्षा घेण्यास असलेली परीक्षा परवानगी प्रत मी अभ्यासली असून मला समजली आहे.

12. परीक्षा शुल्क (रुपये पन्नास) मी पालक म्हणून स्वखुशीने देत आहे.

13. परीक्षा तयारीसाठी खरेदी केलेले अवांतर परीक्षा साहित्य रकमेचा मंथन वेल्फेअर फाउंडेशन शी कुठलाही संबंध नाही हे पालकांनी लक्षात घ्यावे.

14. परीक्षेचा काठिण्यस्तर शालेय अभ्यासक्रमास पूरक असून यामुळे परीक्षार्थीवर अभ्यासाचा कोणताही अतिरिक्त ताण पडणार नाही याउलट त्यांच्या गुणवत्तेत वाढ होईल याची जाणीव पालक परीक्षार्थी या दोघांनाही असावी.

15. पालकांनी परीक्षार्थी विषयी वरील संगणकीय परीक्षा अर्जातील कोणतीही चुकीची माहिती दिल्यास परीक्षा प्रक्रियेतील कोणत्याही स्तरावर संबंधित परीक्षार्थीला संपूर्ण प्रक्रियेतून वगळण्यात येईल याची संपूर्ण जबाबदारी संबंधित पालकावर राहील, अशा परिस्थितीमध्ये त्यांना परीक्षा शुल्क रक्कम परत मिळणार नाही.

16. कृपया तुमच्या तक्रारी व सुचना लेखी स्वरूपात मंथन वेल्फेअर फाउंडेशनच्या कार्यालयाकडे पाठवाव्यात.

17. चालू शैक्षणिक वर्षात covid-19 च्या संक्रमणाच्या धोक्यामुळे अथवा इतर कोणतेही नैसर्गिक, सामाजिक आपत्तीमुळे किंवा मंथन परीक्षा समितीने परीक्षा रद्द केल्यास विद्यार्थ्यांनी भरलेल्या परीक्षा शुल्क रुपये पन्नास रक्कमच परत केली जाईल, त्याने अथवा पालकाने खरेदी केलेल्या इतर अवांतर साहित्य, ट्युशन फी इत्यादीं शी मंथन वेल्फेअर फाउंडेशनचा कुठलाही संबंध नाही.

18. परीक्षेसंदर्भात सर्व कायदेशीर बाबी जिल्हा न्यायालय अहमदनगर यांच्या कार्यकक्षा अंतर्गत येतील.

19. वरील परीक्षे विषयीच्या सर्व नियम व अटी मी (पालक) वाचल्या असून त्या आम्हाला मान्य आहेत व त्यांच्याशी आम्ही (पालक व विद्यार्थी) पूर्ण सहमत आहोत.