प्रिय विद्यार्थी, पालक व शिक्षक,
मागील वर्षाच्या कोविड विषयक शासकीय धोरणानुसार जवळजवळ वर्षभर शाळा बंद राहील्यास्तव आपण आपली मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा 2021 चे आयोजन करू शकलो नाही, तसेच मागील शैक्षणिक वर्षात आपण आपली परीक्षा ऑनलाईन घेण्याबाबत पूर्वीच पालकांना अवगत केले नसल्याने आपण 2021 चे परीक्षा नियोजन रद्द केली होती. पुढील म्हणजे शैक्षणिक वर्ष 2021-22 करीता आपण आपले परीक्षा नियोजन सुरू केले आहे. लसीकरणाचा वेग तसेच नवीन शैक्षणिक धोरणानुसार यावर्षी शाळा सुरू होण्या बाबत आशादायक वातावरण आहे, म्हणून पुन्हा आशावादी दृष्टिकोनातून लेखी परीक्षेचे आयोजन केले आहे, शाळा सुरू झाल्यावर आपण निश्चितपणे यशस्वी परीक्षा आयोजन करणार आहोत, लेखी (OMR) परीक्षा शाळा सुरू न झाल्याने जर होऊ शकत नसेल तरच आपण video व Artificial intelligence Proctoring द्वारे online परीक्षेचे आयोजन करणार आहोत.
मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा २०२१-२२ करीता नोंदणी साठी व परीक्षा किट मागणी करीता पूढील बटनावर क्लिक करा.
मार्गदर्शक आणि सराव प्रश्नपत्रिका संच पोस्टाने मोफत वितरित केल्या जातील. अधिक माहिती करीता Contact Us किंवा संपर्क +9199229 50627